मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित विराटपेक्षा सरस : संदीप पाटील 

वृत्तसंस्था
Wednesday, 27 December 2017

नवी दिल्ली : विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे हे निर्विवाद; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे विधान माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप यांनी केले आहे. 

नवी दिल्ली : विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे हे निर्विवाद; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा श्रेष्ठ आहे, असे विधान माजी कसोटीपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप यांनी केले आहे. 

विराटच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत नेतृत्वाची धुरा सांभाळली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक व ट्‌वेन्टी-20 सामन्यात सर्वांत जलद शतकाच्या विक्रमाशी बरोबरी त्याने केली. त्याचबरोबर दोन्ही मालिका जिंकल्या. 
विराट हा निश्‍चितच सर्वोत्तम फलंदाज आहे; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित त्याच्यापुढे आहे, असे सांगून संदीप पाटील म्हणतात, दक्षिण आफ्रिकेत विराट फॉर्मात येईल आणि भरपूर धावा करेल; परंतु यंदाच्या वर्षातील मर्यादित षटकांच्या खेळाचा विचार करता रोहितने अनन्यसाधारण फलंदाजी केली. श्रीलंकेविरुद्धच रोहित जास्त सामने खेळला, असे कोणी म्हणत असेल तर विराटलाही तशीच संधी मिळालेली आहे. 

संदीप पाटील रोहित शर्माला विराटपेक्षा श्रेष्ठ समजत असतील तरी यंदाच्या वर्षात विराटची आकडेवारी तिन्ही प्रकारच्या खेळांत रोहितपेक्षा भारी आहे. 

2017 मधील विराट - रोहितची कामगिरी 
या वर्षात विराटने 26 सामन्यांत सहा शतके आणि सात अर्धशतकांसह 1460 धावा केल्या आहेत. 

रोहितने 21 सामन्यांत सहा शतके (त्यात एक द्विशतक) पाच अर्धशतकांसह 71.83 च्या सरासरीने 1140 धावा उभारल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये कोहली सहा सामन्यांतून 37.37 च्या सरासरीने 299 धावा केल्या असून, तो क्रमवारीत सहावा आहे; तर रोहितने नऊ सामन्यांतून 31.44 च्या सरासरीने 283 धावा करून आठव्या क्रमांकावर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket news Team India Rohit Sharma Virat Kohli