भारत लंकेविरुद्ध खेळणार की आफ्रिका? 

वृत्तसंस्था
Sunday, 30 July 2017

मुंबई/नवी दिल्ली : या वर्षाच्या अखेरच्या पंधरवड्यात भारत श्रीलंकेविरुद्ध खेळणार की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, यावरून नवा तिरंगी संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. श्रीलंका संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे, तर आफ्रिकेला भारताविरुद्धची बॉक्‍सिंग डे कसोटी (26 डिसेंबरपासून सुरू होणारी) हवी आहे. 

श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचे तसेच भारताच्या आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. क्रिकेट दक्षिण आफ्रिका ऑगस्टच्या सुरुवातीस कार्यक्रम जाहीर करण्याची शक्‍यता आहे.

श्रीलंका संघ तीन कसोटी, पाच वन-डे तसेच एका ट्‌वेंटी-20 साठी भारतात येणार आहे. खरे तर श्रीलंकेचा भारत दौरा फेब्रुवारीत होता; मात्र श्रीलंका त्याच कालावधीत तिरंगी इंडिपेंडन्स कप स्पर्धा घेत आहे. त्यामुळे त्यांनी भारतास दौऱ्याच्या कार्यक्रमात बदल करण्यास तयार केले.

आता भारत तयार झाल्यामुळे पाकविरुद्धच्या मालिकेच्या कार्यक्रमातही बदल होईल. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अमिरातीत दोन कसोटी, पाच वन-डे आणि तीन ट्‌वेंटी-20 होणार आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news cricket Team India BCCI India versus Sri Lanka India versus South Africa