esakal | भारतील फलंदाजांसाठी सुखद बातमी; ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क जायबंदी 
sakal

बोलून बातमी शोधा

Mitchell Starc

भारतील फलंदाजांसाठी सुखद बातमी; ऑस्ट्रेलियाचा मिशेल स्टार्क जायबंदी 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीतून अद्याप पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आगामी भारत दौऱ्यासाठीच्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे. स्टार्कच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू जेम्स फॉकनरला पुनरागमनाची संधी मिळाली आहे. 

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 17 सप्टेंबर ते 13 ऑक्‍टोबर या कालावधीत ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिका होणार आहे. त्यासाठीचा संघ 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'ने जाहीर केला. 

ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने यष्टिरक्षक म्हणून मॅथ्यू वेडऐवजी टीम पेनी याला प्राधान्य दिले आहे. ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी अष्टपैलू डॅनियल ख्रिस्तियन याचे पुनरागमन झाले आहे. यापूर्वी तो शेवटचा सामना 2014 मध्ये खेळला होता. 

या वर्षाच्या सुरवातीला झालेल्या भारताविरुद्धच्या मालिकेमध्येच मिशेल स्टार्क जायबंदी झाला होता. त्यानंतर इंग्लंडमध्ये झालेल्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेसाठी त्याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले होते; पण त्यावेळीही तो पूर्ण तंदुरुस्त नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघातून त्याला वगळण्यात आले होते. भारत दौऱ्यापूर्वी तंदुरुस्त होण्यासाठीच हा निर्णय घेतला होता; पण अद्यापही तो पूर्ण तंदुरुस्त झाला नसल्याने आता इंग्लंडविरुद्धच्या ऍशेस कसोटी मालिकेमध्येच तो पुनरागमन करण्याची दाट शक्‍यता आहे. 

एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : 
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ऍश्‍टन ऍगर, हिल्टन कार्टराईट, नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, जेम्स फॉकनर, ऍरॉन फिंच, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्‍सवेल, मार्कस स्टॉईनिस, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), ऍडम झम्पा. 

ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ : 
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर (उपकर्णधार), जेसन बेऱ्हेनड्रॉफ, डॅनियल ख्रिस्तियन, नॅथन कुल्टर-नाईल, पॅट कमिन्स, ऍरॉन फिंच, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिकेस, ग्लेन मॅक्‍सवेल, टीम पेनी (यष्टिरक्षक), केन रिचर्डसन, ऍडम झम्पा.