भारताकडे आता पाच भन्नाट वेगवान गोलंदाज आहेत : प्रसाद 

वृत्तसंस्था
Friday, 22 December 2017

कोलकाता : 'नव्या वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाकडे यंदा दर्जेदार गोलंदाजांचा भन्नाट ताफा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेला हा भारतीय गोलंदाजांचा सर्वोत्तम ताफा असेल', असे मत निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले. भारतीय संघामध्ये ईशांत शर्मा, महंमद शमी, उमेश यादव, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह असे पाच वेगवान गोलंदाज आहेत. 

प्रसाद म्हणाले, "प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजीविषयी मी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. पण सध्याच्या भारतीय संघाची गोलंदाजी सर्वोत्तम आहे, यात शंका नाही. उमेश आणि शमी दोघेही वेगाने गोलंदाजी करतात; पण तरीही चेंडू स्विंग करण्याची कला त्यांच्याकडे आहे. दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करू शकणारा भुवनेश्‍वरही संघात आहे. ईशांतकडे अनुभव आहे आणि बुमराहकडे वैविध्य आहे. शिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्याही गोलंदाजीला आणखी धार आणू शकतो.'' 

भारताचा भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे गेल्या काही सामन्यांपासून चाचपडताना दिसत आहे. मात्र, प्रसाद यांनी रहाणेला पूर्ण पाठिंबा दिला. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यानेही रहाणेला पाठिंबा दिला होता. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पाच डावांमध्ये रहाणेला केवळ 17 धावा करता आल्या होत्या. 

"आम्हाला रहाणेच्या फॉर्मची चिंता वाटत नाही. परदेशी खेळपट्ट्यांवर रहाणे हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. परदेशात त्याने केलेल्या कामगिरीचे कौतुक करायलाच हवे. रहाणेकडे अनुभव आहे आणि अशा अपयशाला सामोरे जाण्याची कला त्याच्याकडे आहे', असा विश्‍वास प्रसाद यांनी व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa MSK Prasad