साहा दुखापतग्रस्त; पार्थिवची ढिसाळ कामगिरी; आता कार्तिक संघात! 

वृत्तसंस्था
Tuesday, 16 January 2018

सेंच्युरियन : दुखापतग्रस्त झालेल्या वृद्धिमान साहाच्या जागी अनुभवी यष्टिरक्षक दिनेश कार्तिकला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान साहाला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात पार्थिव पटेलकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली. 

कसोटी मालिकेनंतर होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी कार्तिकची भारतीय संघात निवड झाली आहे. आता साहाच्या दुखापतीमुळे कार्तिक दोन आठवडे आधीच दक्षिण आफ्रिकेत दाखल होणार आहे. 

2004 मध्ये कार्तिकने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यापूर्वी कार्तिक तब्बल आठ वर्षांपूर्वी कसोटी खेळला होता. महेंद्रसिंह धोनीच्या पदार्पणानंतर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये कार्तिकची जागा डळमळीत झाली होती. मात्र, देशांतर्गत स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून कार्तिकने कायम निवड समितीच्या चर्चेत स्थान मिळविले होते. 

सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये स्थान मिळालेल्या पार्थिव पटेलची कामगिरी प्रभावी झालेली नाही. त्यातच, दुखापत बळावल्याने साहाला मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतावे लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने कार्तिकला तातडीने पाचारण करण्यात आले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Parthiv Patel Dinesh Karthik