भारतासाठी 'वेग' अजून दूरच : शोएब अख्तर

पीटीआय
Saturday, 20 January 2018

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ अपयशी ठरत असला, तरी वेगवान गोलदाजांनी आपली छाप पाडली आहे, परंतु पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरच्या मते वेगवान गोलंदाजांची पंढरी अशी भारताची ओळख निर्माण होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल. 

प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत. ईशांत शर्मा, उमेश यादव, महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरा हे पाच जण कोणत्याही फलंदाजाला आपली ताकद दाखवण्याची क्षमता बाळगून आहेत. आत्तापर्यंतचा भारताचा हा सर्वोत्तम वेगवान मारा असल्याचे बोलले जात आहे; परंतु शोएब अख्तरचे मात्र वेगळे मत आहे. 

भारताकडे वेगवान गोलंदाज नाहीत असे मला म्हणायचे नाही; परंतु हे सर्व गोलंदाज प्रगती करत आहेत आणि भारत वेगवान गोलंदाजांचा देश असे ओळखण्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार आहे, असे सांगून अख्तर म्हणतो, ''पाच वर्षांपूर्वी मी वरुण ऍरॉन, उमेश यादव आणि महंमद शमी यांना पाहिले तेव्हा ते परदेशात भारतीय संघाची धुरा सांभाळतील, असे वाटले होते, मात्र ऍरॉनच्या तंदुरुस्तीचा प्रश्‍न निर्माण झाला. उमेशकडे सातत्य राहिले नाही.'' 

भारतीय संघाची सध्याची कामगिरी प्रगतिपथावर आहे. एकत्रितपणे या संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याची क्षमता विराट कोहली आणि भारतीय संघ व्यवस्थानाकडे आहे. भारत हा फलंदाजांची खाण यासाठी प्रसिद्ध आहे, आता नवे वेगवान गोलंदाजही तयार होत आहेत. तरीही वेगवान गोलंदाजांचा देश म्हणून ठसा उमटवण्यासाठी बराच वेळ लागेल, याचा पुनरुच्चार शोएबने केला. 

भारताने पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत चांगला खेळ केला नाही हे सत्य आहे. त्यांनी अधिक सक्षमपणे खेळ करायला हवा होता. चुकीची संघनिवड, योग्य वेळी विकेट न मिळवणे आणि फलंदाजांनी पुरेशा धावा न करणे हे या मागचे कारण असल्याचे अख्तरने सांगितले. 

दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांत भारताचा झालेला पराभव माझ्यासाठी धक्कादायक होता. काही जाणकांना भारतीय संघाचे हे अपयश अपेक्षित असले तरी माझ्या मते भारत अजूनही कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहे. 
- शोएब अख्तर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Team India Shoaib Akhtar