रहाणे आणि भुवनेश्‍वर संघाबाहेर; पण ईशांत, रोहित संघात! 

Saturday, 13 January 2018

सेंच्युरियन: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासून आजपर्यंत एकदाही कसोटी संघ कायम राखलेला नाही. प्रत्येक कसोटीत त्याने काही ना काही बदल केलाच आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये मात्र कोहलीने निवडलेल्या संघावरून टीका सुरू झाली आहे. 

या मालिकेतील पहिल्या सामन्यात भुवनेश्‍वर कुमारच्या भन्नाट वेगवान गोलंदाजीमुळे भारतीय संघाला एकवेळ सामना जिंकण्याची संधी निर्माण झाली होती. इतकेच नव्हे, तर फलंदाजी करतानाही त्याने तब्बल 127 चेंडूंचा सामना केला होता. याच खेळपट्टीवर इतर 'बलवान' भारतीय फलंदाज ढेपाळले होते. पण दुसऱ्या कसोटीमध्ये कोहलीने भुवनेश्‍वरला संघातून वगळले आणि त्याच्या जागी ईशांत शर्माला संघात स्थान दिले. 'या खेळपट्टीवर अतिरिक्त 'बाऊन्स' मिळेल. त्याचा फायदा घेण्यासाठी ईशांतला संघात स्थान मिळाले आहे', असे कोहलीने नाणेफेक झाल्यानंतर सांगितले. 

यावर अर्थातच ट्‌विटरवर प्रचंड टीका झाली. 

दुसरीकडे, रोहित शर्माचे संघातील स्थान कायम राखण्यासाठी उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेला पुन्हा बाहेर बसावे लागले. परदेशी खेळपट्ट्यांवरील भारताचा सर्वोत्तम फलंदाज असलेल्या रहाणेला संघाबाहेर ठेवण्याच्या या निर्णयावरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news India versus South Africa Virat Kohli Ajinkya Rahane Bhuvneshwar Kumar