धोनी 'चेन्नईत' परतला; कोहली-डिव्हिलर्सची जोडी 'बंगळूर'कडेच! 

वृत्तसंस्था
Thursday, 4 January 2018

मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील प्रत्येकी तीन खेळाडू कायम राखण्याची परवानगी देण्यात आली होती. यानुसार प्रत्येक संघाने त्यांच्या खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने अपेक्षेनुसार विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्स या धडाकेबाज खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. पण आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, ख्रिस गेल किंवा मिशेल स्टार्क या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी एकाचीही निवड न करता या संघ व्यवस्थापनाने सर्फराझ खान या नवोदित खेळाडूला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, 'राईट टू मॅच'च्या अधिकारानुसार लिलावादरम्यान पुन्हा या खेळाडूंसाठी संघ व्यवस्थापन प्रयत्न करू शकेल. 

कायम ठेवण्यात आलेले प्रत्येक संघातील खेळाडू (कंसात त्या खेळाडूंना मिळणारी रक्कम रुपयांमध्ये) : 
 
                    मुंबई इंडियन्स                    
रोहित शर्मा (15 कोटी), हार्दिक पांड्या (11 कोटी), जसप्रित बुमराह (7 कोटी) 

                    रॉयल चॅलेंजर्स बंगळूर                    
विराट कोहली (17 कोटी), एबी डिव्हिलर्स (11 कोटी), सर्फराझ खान (1.75 कोटी) 

                    कोलकाता नाईट रायडर्स                    
सुनील नारायण (8.5 कोटी), आंद्रे रसेल (7 कोटी) 

                    दिल्ली डेअरडेव्हिल्स                    
रिषभ पंत (8 कोटी), ख्रिस मॉरिस (7.1 कोटी), श्रेयस अय्यर (7 कोटी) 

                    किंग्ज इलेव्हन पंजाब                    
अक्षर पटेल (6.75 कोटी) 

                    सनरायझर्स हैदराबाद                    
डेव्हिड वॉर्नर (12 कोटी), भुवनेश्‍वर कुमार (8.5 कोटी) 

                    चेन्नई सुपर किंग्ज                    
महेंद्रसिंह धोनी (15 कोटी), सुरेश रैना (11 कोटी), रवींद्र जडेजा (7 कोटी) 

                    राजस्थान रॉयल्स                    
स्टीव्ह स्मिथ (12 कोटी) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sports news Indian Premier League IPL Retention Chennai Super Kings MS Dhoni