esakal | विदर्भ प्रथमच रणजी विजेते
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भ प्रथमच रणजी विजेते

विदर्भ प्रथमच रणजी विजेते

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेने गेल्या साठ वर्षांपासून पाहिलेले रणजी करंडकाचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. इंदूर येथील होळकर स्टेडियमवर सोमवारी संपलेल्या अंतिम सामन्यात कर्णधार फैज फजलच्या नेतृत्वात विदर्भ संघाने चौथ्याच दिवशी दिल्लीचा नऊ गड्यांनी धुव्वा उडवून प्रथमच रणजी करंडकावर नाव कोरले. शिवाय कोट्यवधी वैदर्भी चाहत्यांना नववर्षाची अनोखी व अविस्मरणीय भेट दिली. 

दिल्लीने विदर्भाला निर्णायक विजयासाठी 29 धावांचे सोपे विजयी लक्ष्य दिले होते. विदर्भाने फैज फजलची विकेट गमावून पाच षटकांतच लक्ष्य गाठले. मध्यमगती गोलंदाज रजनिश गुरबानीने हॅट्ट्रिकसह एकूण आठ गडी बाद करून विजयात मोलाचा वाटा उचलला. 'मॅचविनिंग' कामगिरीबद्‌दल गुरबानीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. अनुभवी फिरकीपटू अक्षय वखरेनेही दुसऱ्या डावात चार गडी बाद करून विजयास हातभार लावला. याशिवाय पहिल्या डावात मोक्‍याच्या क्षणी शतक झळकाविणारा यष्टीरक्षक अक्षय वाडकरचेही विजयात उल्लेखनीय योगदान राहिले. 

धावफलक 
दिल्ली पहिला डाव 295.
विदर्भ पहिला डाव : (7 बाद 528 वरून)
अक्षय वाडकर झे. राणा गो. खेजरोलिया 133, सिद्धेश नेरळ झे. पंत गो. सैनी 74, रजनिश गुरबानी नाबाद 0, आदित्य ठाकरे झे. शोरी गो. सैनी 0, अवांतर 28,
एकूण 163.4 षटकांत सर्वबाद 547. 
गडी बाद क्रम : 1-96, 2-107, 3-133, 4-206, 5-237, 6-246, 7-415, 8-547, 9-547, 10-547.
गोलंदाजी : आकाश सुदन 27-3-102-2, नवदीप सैनी 36.3-5-135-5, नितीश राणा 13.1-1-32-1, कुलवंत खेजरोलिया 39-8-132-2, विकास मिश्रा 38-6-102-0, ध्रुव शोरी 10-1-27-0.
दिल्ली दुसरा डाव : कुणाल चंडेला झे. गुरबानी गो. वखरे 9, गौतम गंभीर पायचीत गो. गुरबानी 36, ध्रुव शोरी झे. वाडकर गो सरवटे 55, नितीश राणा झे. वाडकर गो. गुरबानी 64, रिषभ पंत झे. वानखेडे गो. नेरळ 32, हिंमत सिंग त्रि. गो. वखरे 0, मनन शर्मा त्रि. गो. वखरे 8, विकास मिश्रा यष्टीचित वाडकर गो. सरवटे 34, नवदीप सैनी झे. सरवटे गो. वखरे 5, आकाश सुदन झे. वानखेडे गो. सरवटे 18, कुलवंत खेजरोलिया नाबाद 1, अवांतर 11, एकूण 76 षटकांत सर्वबाद 280.
गडी बाद क्रम : 1-32, 2-50, 3-164, 4-189, 5-190, 6-222, 7-228, 8-234, 9-279, 10-280.
गोलंदाजी : रजनिश गुरबानी 18-2-92-2, आदित्य ठाकरे 12-6-14-0, अक्षय वखरे 28-2-95-4, आदित्य सरवटे 9-1-30-3, सिद्‌धेश नेरळ 9-1-39-1. 
विदर्भ दुसरा डाव : फैज फजल पायचीत गो. खेजरोलिया 2, आर. संजय नाबाद 9, वसीम जाफर नाबाद 17, अवांतर 4, एकूण 5 षटकांत 1 बाद 32. गडी बाद क्रम : 1-2. गोलंदाजी : कुलवंत खेजरोलिया 3-0-21-1, आकाश सुदन 2-0-7-0. 

loading image