भारताचे अपराजित युवक इतिहासाच्या वाटेवर

पीटीआय
Saturday, 3 February 2018

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत चौथ्यांदा विश्‍वविजेतेपदाला कवेत घेण्यासाठी पृश्‍वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

माउंट मौंगनुई (न्यूझीलंड) : विजयी अश्‍व चौफेर उधळून अपराजित राहत चौथ्यांदा विश्‍वविजेतेपदाला कवेत घेण्यासाठी पृश्‍वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणारा आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला भारतीय संघ सज्ज झाला आहे. उद्या होणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल.

ऑस्ट्रेलियानेही भारताप्रमाणे तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. 
याच ऑस्ट्रेलियाला सलामीच्या सामन्यात पाणी पाजून भारताने या स्पर्धेची मोहीम सुरू केली. अंतिम फेरीत स्थान मिळवताना त्यांनी एकही सामना गमावलेला नाही, तर भारताकडून झालेल्या पराभवानंतर कामगिरी उंचावत ऑस्ट्रेलियानेही अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. 

भारताने आत्तापर्यंत महंमद कैफ (2002), विराट कोहली (2008) आणि उन्मुक्त चंद (2012) यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या स्पर्धेतील आत्तापर्यंतच्या कामगिरीनुसार भारताचे पारडे जड आहे. सलामीला ऑस्ट्रेलियाला 100 आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तानला 203 धावांनी केलेले पराभव भारताची ताकद आणि आत्मविश्‍वास वाढवणारे आहेत. 

सांघिक कामगिरी 
अंतिम सामन्यापर्यंतच्या अपराजित मालिकेत सांघिक कामगिरी निर्णायक राहिली आहे. सलामीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पृथ्वी शॉ, पाकिस्तानविरुद्ध शुभम गिलचे शतक. मनज्योत कार्ला याने फलंदाजीत तर कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी यांचा ताशी 140 पेक्षा अधिक वेगवान मारा. तेवढीच क्षमता असलेल्या इशान पोरलची तंदुरुस्ती. अनुकूल रॉयची फिरकी गोलंदाजी भारतासाठी महत्त्वाची ठरली आहे. 

संघ : पृथ्वी शॉ (कर्णधार), शुभम गिल, मनज्योत कार्ला, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, हार्विक देसाई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, इशान पोरल, अनुकूल रॉय, शिवा शिंग, आर्यन ज्युयल, अक्षरदीप सिंग, पंकज यादव. 

ऑस्ट्रेलिया : जेसन सांघा (कर्णधार), विल सदरलॅंड, झेव्हियर बार्लेटलेट, मक्‍स ब्रयंट, जॅक एडवर्डस्‌, झॅक इव्हान्स, जेरॉर्ड फ्रीमन, रेयन हार्डली, बाक्‍स्टर जे हॉल्ट, नॅथन मॅकस्वेनी, जोनाथन मेर्लो, लॉयड पोप, पारम उप्पल, ऑस्ट्रिन वॉ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Under 19 Cricket World Cup Final India versus Australia