आमच्यावर जादूटोणा केला; म्हणून भारताकडून हारलो! : पाकिस्तान 

पीटीआय
Monday, 5 February 2018

कराची : भारतासारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्याकडून विश्‍वकरंडकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत झालेला पराभव पचविणे पाकिस्तानसाठी नेहमीच जड जाते.. पण 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापकाने अजबच तर्क लढविण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मते, 'कुणीतरी आमच्या खेळाडूंवर जादूटोणा केल्यासारखे वाटत होते!' 

या स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताने प्रथम फलंदाजी करताना 272 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 69 धावांत बाद झाला. 

Under 19 Cricket World Cup India versus Pakistan

या स्पर्धेसाठी नदीम खान हे पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक होते. न्यूझीलंडहून मायदेशी परतल्यानंतर खान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'भारताविरुद्ध आमचे खेळाडू जसे खेळले, त्यावरून त्यांच्यावर कुणीतरी जादूटोणा केल्यासारखेच वाटत होते', असे ते म्हणाले. 

"हा सामना प्रचंड चुरशीचा होईल, अशी आम्हाला खात्री होती. पण जसजसा सामना पुढे होत गेला, तसतसा आमचा खेळ ढेपाळला. केवळ 69 धावांत संघ बाद झाल्यानंतर तर त्यांच्या कामगिरीवर कुणीतरी जादू केल्यासारखेच वाटत होते. मैदानावर काय होत आहे, हे आमच्या फलंदाजांना समजतच नव्हते. त्या परिस्थितीला किंवा दडपणाला कसे सामोरे जायचे, हेच त्यांना कळत नव्हते', असे खान म्हणाले. 

Under 19 Cricket World Cup India versus Pakistan

विशेष म्हणजे, नदीम खान हे पाकिस्तानचे माजी कसोटीपटू आहेत. 1999 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी संघात खान यांचा समावेश होता. पाकिस्तानचे माजी यष्टिरक्षक मोईन खान यांचे नदीम हे ज्येष्ठ बंधू आहेत. 

उपांत्य फेरीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमला भेट दिली. हताश झालेल्या पाकिस्तानी खेळाडूंना द्रविड यांनी धीर दिला, अशी माहिती खान यांनी दिली. 'द्रविड यांची ही कृती खूपच चांगली होती. द्रविड यांची आमच्या मनातील प्रतिमा आणखी उंचावली' अशी प्रतिक्रिया खान यांनी व्यक्त केली. 

आम्ही उपांत्य फेरी गाठली असली, तरीही एकूण कामगिरी फार समाधानकारक नव्हती. यापूर्वीच्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भाग घेतलेल्या पाकिस्तानच्याच इतर संघांशी तुलना केली, तर यंदाच्या संघात अनेक त्रुटी आणि उणीवा होत्या. 
- नदीम खान, पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Under 19 Cricket World Cup India versus Pakistan