जगात भारी, विराट कोहली..! : मियांदाद 

वृत्तसंस्था
Thursday, 8 February 2018

कराची : 'विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे.. ब्रिलियंट!' अशा शब्दांत पाकिस्तानचे माजी कर्णधार जावेद मियांदाद यांनी कोहलीचे कौतुक केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात काल (बुधवार) कोहलीने 34 वे शतक झळकावित भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सहा सामन्यांच्या मालिकेत भारताकडे आता 3-0 अशी आघाडी आहे. हे कोहलीचे ५५ वे आंतरराष्ट्रीय शतक होते.

पाकिस्तानमधील एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत मियांदाद म्हणाले, 'कोहलीची फलंदाजीची शैली अफलातून आहे. त्यामुळे एखाद्‌-दुसऱ्या वेळीच नव्हे, तर प्रत्येकवेळी मैदानात उतरल्यावर तो भन्नाट खेळी करू शकतो. एखाद्या फलंदाजाची शैली सदोष असेल, तर क्वचित कधीतरी तो मोठ्या धावा करेल; पण कोहलीचे तसे नाही. त्याचे सातत्य अविश्‍वसनीय आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजाची बलस्थाने आणि कमकुवत बाजू कोहली चटकन ओळखतो आणि त्यानुसार स्वत:च्या फलंदाजीत बदल करतो. कोहली हा 'जिनियस' आहे.'' 

Virat Kohli International Centuries

या मुलाखतीमध्ये मियांदाद यांनी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानच्या कामगिरीवरही भाष्य केले. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत पाकिस्तानला भारताकडून 203 धावांनी मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात पाकिस्तानचा संघ केवळ 69 धावांत गुंडाळला गेला होता. 'या संघाने नशीबानेच उपांत्य फेरी गाठली होती' असे मत मियांदाद यांनी व्यक्त केले. 

'भारताकडून 203 धावांनी झालेला पराभव पचविणे अवघड आहे; पण खरं सांगायचं झालं, तर नशीबानेच पाकिस्तान उपांत्य फेरीत पोचला होता. पाकिस्तानच्या खेळाडूंकडे कुठलाही अनुभव नव्हता. जय-पराजय हे कोणत्याही खेळातील अविभाज्य भाग असतातच; पण इतक्‍या मोठ्या फरकाने झालेला पराभव हा दोन्ही संघांच्या क्षमतेतील फरकच सिद्ध करणारा होता'', असे मियांदाद म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli cricket news India versus South Africa Javed Miandad