कोहलीची निवड केल्यामुळे पद गमावले : वेंगसरकर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 March 2018

मुंबई : भारताचा सध्याचा सुपरस्टार विराट कोहली याची भारतीय संघात निवड माझ्या निवड समिती अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झाली; पण त्याला संधी दिल्यामुळे मला निवड समितीचा राजीनामा द्यावा लागला, असा गौप्यस्फोट दिलीप वेंगसरकर यांनी केला. मुंबई पत्रकार संघाच्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात वेंगसरकर बोलत होते. 

या समारंभात वरिष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी आणि युवा पुरस्कारासाठी संदीप कदम यांना वेंगसरकर आणि भारताचे माजी यष्टीरक्षक फारुक इंजिनियर यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमात वेंगसरकर आणि इंजिनियर या मुंबईकर माजी खेळाडूंनी त्यांच्या काळातील अनेक प्रसंगांचा उलगडा केला. 

विराटला संधी देण्याचा प्रसंग सांगताना वेंगसरकर म्हणाले, ''विराटने 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियात इमरर्जिंग खेळाडूंची स्पर्धा व्हायची. त्यामध्ये आपला संघही खेळायचा. आम्ही त्या संघात जास्तीत जास्त तरुण खेळाडूंना संधी दिली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या एका सामन्यात मी विराटची शतकी खेळी पाहिली आणि त्याला पुढे जाऊन मुख्य संघासाठी विचार करण्याचे ठरवले. योगायोगाने भारतीय संघाचा पुढचा दौरा श्रीलंकेचा होता. हीच संधी असून, मी निवड समितीत इतर सदस्यांसमोर विराटचे नाव ठेवले. त्यांनीही मला पाठिंबा दिला; परंतु कर्णधार धोनी आणि तत्कालीन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी आम्ही त्याचा खेळ पाहिला नसल्याचे सांगितले. विराटची निवड करायची तर तमिळनाडूच्या बद्रीनाथला वगळावे लागणार होते. तसे झाले. त्यानंतर तमिळनाडूचे आणि माजी अध्यक्ष एन. श्रीनिवास यांना मी केलेला बदल पटला नाही. त्यांनी माझी तक्रार केली आणि मला पद सोडावे लागले; पण विराटची ही निवड किती योग्य होती, हे आता समजले असेल.'' 

याच कार्यक्रमासाठी खास लंडनहून आलेल्या इंजिनियर यांनी आपल्या मिस्कील भाषेत क्रिकेटच्या अनुभवांबरोबर खवय्येगिरीचीही उदाहरणे सांगितली. बोंबील हा माशाचा प्रकार आपला फारच आवडीचा असल्याचे ते म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli dilip vengsarkar Team India