कोहलीचा धडाका कायम; अजहरुद्दीन आणि ख्रिस गेलला टाकले मागे

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने विक्रम मोडीत काढण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीनला मागे टाकले. 

नवी दिल्ली : भन्नाट सूर गवसलेल्या विराट कोहलीने विक्रम मोडीत काढण्याचा धडाकाच लावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात 75 धावा करणाऱ्या कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार महंमद अजहरुद्दीनला मागे टाकले. 

वॉंडरर्सच्या मैदानावर झालेल्या त्या सामन्यानंतर कोहलीच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9,423 धावा झाल्या आहेत. अजहरुद्दीनच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये 9,378 धावा होत्या. 29 वर्षीय कोहलीने ही कामगिरी केवळ 206 सामन्यांमध्ये केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत भारताचाच सचिन तेंडुलकर (18,426) अव्वल स्थानी आहे. या यादीतील पहिल्या पाच भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीने स्थान मिळविले आहे. कोहलीच्या पुढे महेंद्रसिंह धोनी (9,954), राहुल द्रविड (10,889), सौरभ गांगुली (11,363) आणि सचिन हे भारतीय फलंदाज आहेत. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे 20 फलंदाज 

क्रमांक खेळाडू संघ सामने धावा शतके
1 सचिन तेंडुलकर भारत 463 18,426 49
2 कुमार संगाकारा श्रीलंका 404 14,234 25
3 रिकी पाँटिंग ऑस्ट्रेलिया 375 13,704 30
4 सनथ जयसूर्या श्रीलंका  445 13,430 28
5 महेला जयवर्धने श्रीलंका 448 12,650 19
6 इंझमाम उल हक पाकिस्तान 378 11,739 10
7 जॅक्‍स कॅलिस दक्षिण आफ्रिका 328 11,579 10
8 सौरभ गांगुली भारत 311 11,363 22
9 राहुल द्रविड भारत 344 10,889 12
10 ब्रायन लारा वेस्ट इंडीज 299 10,405 19
11 तिलकरत्ने दिल्शान श्रीलंका 330 10,290 22
12 महेंद्रसिंह धोनी भारत 316 9,954 10
13 महंमद युसूफ पाकिस्तान 288 9,720 15
14 ऍडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलिया 287 9,619 16
15 एबी डिव्हिलियर्स दक्षिण आफ्रिका 226 9,541 25
16 विराट कोहली भारत 206 9,423 34
17 ख्रिस गेल वेस्ट इंडीज 275 9,420 22
18 महंमद अजहरुद्दीन भारत 334 9,378 7
19 अरविंद डिसिल्वा श्रीलंका 308 9,284 11
20 सईद अन्वर पाकिस्तान 247 8,824 20

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli Highest ODI runs for India Sachin Tendulkar