कोहलीचा पगार वर्षाला सात कोटी; मग धोनीचा किती?

वृत्तसंस्था
Thursday, 8 March 2018

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत. 

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत. 

यंदापासून 'बीसीसीआय'ने 'ए+' असा नवा गटही तयार केला आहे. या गटात कर्णधार कोहलीसह, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह हे खेळाडू आहेत. 'ए' गटातील खेळाडूंना वार्षिक पाच कोटी, 'बी' गटातील खेळाडूंना वार्षिक तीन कोटी, तर 'सी' गटातील खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये मानधन मिळणार आहे. विशेष म्हणजे, सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत असलेल्या महंमद शमीला वार्षिक करारातून वगळले आहे. 

पुरुष संघातील खेळाडूंसह महिला संघासाठीही 'बीसीसीआय'ने 'सी' हा नवा गट तयार केला आहे. याशिवाय, देशांतर्गत क्रिकेटसाठीही 'बीसीसीआय'ने खेळाडूंच्या मानधनात वाढ केली आहे. देशांतर्गत खेळाडूंना जवळपास 200 टक्‍क्‍यांची वाढ मिळाली आहे, असे 'बीसीसीआय'च्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. 

देशांतर्गत स्पर्धा (सामन्याचे दर दिवसाचे मानधन) (पुरुष)

अंतिम संघ राखीव खेळाडू
वरिष्ठ 35,000 17,500
23 वर्षांखालील 17,500 8,750
19 वर्षांखालील 10,500 5,250
16 वर्षांखालील 3,500 1,750
देशांतर्गत स्पर्धा (सामन्याचे दर दिवसाचे मानधन) (महिला) अंतिम संघ राखीव खेळाडू
वरिष्ठ 12,500 6,250
23 वर्षांखालील 5,500 2,750
19 वर्षांखालील 5,500 2,750
16 वर्षांखालील 5,500 2,750

ए + : ७ कोटी रुपये
विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह

बी : ५ कोटी रुपये
आर. आश्विन, रवींद्र जडेजा, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, वृद्धिमान साहा.

सी : ३ कोटी रुपये
के. एल. राहुल, उमेश यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, ईशांत शर्मा, दिनेश कार्तिक.

डी : १ कोटी रुपये
केदार जाधव, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, सुरेश रैना, पार्थिव पटेल, जयंत यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli MS Dhoni BCCI payment structure