पहिली लढाई जिंकली; आता उर्वरित सामन्यांसाठी सज्ज : कोहली 

पीटीआय
Friday, 2 February 2018

डर्बन : 'पहिल्याच सामन्यात वर्चस्व गाजवून विजय मिळविल्यामुळे आता मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी संघाचा आत्मविश्‍वास कमालीचा उंचावला आहे' अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात काल (गुरुवार) भारताने सहा गडी राखून विजय मिळविला. कोहलीने 119 चेंडूंत 112 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 269 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारताने चार गड्यांच्या मोबदल्यातच पार केले. 

सामन्यानंतर कोहली म्हणाला, "मालिकेतील पहिला सामना महत्त्वाचा असतो. कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकल्यानंतर संघात निर्माण झालेला उत्साह कायम राखण्यासाठी पहिला एकदिवसीय सामना जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेला 269 धावांमध्येच रोखल्यानंतर आमच्या विजयाची शक्‍यता वाढली होती.'' 

कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत संघाबाहेर बसावे लागलेल्या आणि तिसऱ्या कसोटीत संधी मिळाल्यानंतर प्रभावी कामगिरी करणाऱ्या अजिंक्‍य रहाणेला काल संघात स्थान देण्यात आले होते. त्यानेही 'वन-डे' क्रिकेटमधील त्याचा फॉर्म कायम राखत सलग पाचवे अर्धशतक झळकाविले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रहाणेने 86 चेंडूंत 79 धावा केल्या. कोहली-रहाणेने तिसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. 

Virat Kohli and Ajinkya Rahane

रहाणेचे कोहलीने तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, "अजिंक्‍य हा टॉप क्‍लास खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाजी हा कळीचा मुद्दा असणार आहे, याची आम्हाला जाणीव होती. पण रहाणेची खेळी जबरदस्त होती. त्याने या वेगवान गोलंदाजांना समर्थपणे तोंड देत मोठी खेळी उभारली.'' 

Virat Kohli

थोड्या अजून धावा हव्या होत्या..! 
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस या पराभवानंतर निराश झाला होता. संघ अडचणीत असताना प्लेसिसने शतक झळकाविले होते. पराभवानंतर तो म्हणाला, "आम्ही नक्कीच आवश्‍यक तितक्‍या धावा केल्या नाहीत. माझ्या मते आम्हाला 50-60-70 धावा कमी पडल्या. फलंदाजीमध्ये आम्ही कमी पडलो. लक्ष्याचा पाठलाग करताना षटकामागे केवळ पाच धावा हव्या असतील, तर प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणता येत नाही. तरीही आम्ही गोलंदाजीतील सर्व क्‍लुप्त्या वापरल्या, वेगवेगळ्या पद्धतीने क्षेत्ररचना केली.. पण कोहली आणि रहाणेने सगळे फोल ठरविले.''

Faf Du Plessis

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli ODI Century India versus South Africa