'किंग कोहली'चा भन्नाट फॉर्म कायम; झळकाविले 34 वे शतक 

Thursday, 8 February 2018

केप टाऊन : भन्नाट फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने आज (बुधवार) आणखी एक शतक झळकाविले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील हे कोहलीचे दुसरे, तर एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण 34 वे शतक आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत आता कोहलीच्या पुढे फक्त 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलरच आहे. 

कर्णधारपदाची धुरा स्वीकारल्यापासून 'रन मशिन' कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ आणखी वाढला आहे. गेल्या सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने 121, 29, 113, 112, 46* आणि 101* अशी कामगिरी केली आहे.

या सहा एकदिवसीय सामन्यांत तो फक्त एकदाच शतक न करता बाद झाला आहे. विशेष म्हणजे, या मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये कोहलीने 'वन-डे'त एकही शतक झळकाविले नव्हते. आता याच मालिकेत त्याने दोन शतके झळकाविली आहेत. 

Virat Kohli ODI Centuries

भारतीय कर्णधार म्हणूनही कोहलीने विक्रम मोडीत काढले आहेत. आता कसोटी, एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय कर्णधार म्हणून कोहलीनेच मान मिळविला आहे. कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकाविणाऱ्या यादीत कोहलीने आज सौरभ गांगुलीला मागे टाकले. कर्णधार म्हणून कोहलीची आता 12 शतके आहेत. त्याखालोखाल गांगुली (11), सचिन तेंडुलकर (6) आणि महंमद अजहरुद्दीन (4) हे खेळाडू आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Virat Kohli ODI Century India versus South Africa