esakal | आमचे काम क्रिकेट खेळणे, हेडलाइन देणे नव्हे : विराट
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

आमचे काम क्रिकेट खेळणे, हेडलाइन देणे नव्हे : विराट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्रिटोरिया : दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन डे मालिकेत ऐतिहासिक यश मिळविल्यानंतरही विराट कोहली याने संघाच्या कौतुकाचा स्वीकार करण्यास नकार दिला. आमचे काम क्रिकेट खेळण्याचे आहे, हेडलाइने देण्याचे नव्हे, अशा शब्दांत त्याने मीडियाला एका अर्थाने टोलाही लगावला.

यास कसोटी मालिकेतील पराभवानंतर झालेल्या टीकेची पार्श्वभूमी होती. 

कारकिर्दीत हा परदेशातील सर्वांत मोठा विजय आहे का, या प्रश्नावर तो म्हणाला, की ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हीच सांगू शकता, कारण गेल्या महिन्यापर्यंत आमचा संघ खराब होता. आता असे प्रश्न विचारले जात आहेत. आम्ही मात्र दृष्टिकोन बदललेला नाही. आम्ही केवळ क्रिकेटवरच लक्ष केंद्रित केले आहे. हा विजय मोठा आहे की नाही यात मला पडायचे नाही. क्रिकेट खेळायचे, कसून सराव करायचा, कामगिरी करून दाखवायची, प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न करायचा हेच आमचे काम आहे. 

वन डे मालिकेत विराटने तीन शतके काढली; पण वैयक्तिक फॉर्मविषयी बोलण्याचीही विराटची इच्छा नव्हती. आता आणखी एक खराब फटका बसताच टीकेचा वर्षाव होईल, असा आणखी एक टोला त्याने लगावला.

loading image