मी रोबोट नाही : विराट कोहली

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 नोव्हेंबर 2017

कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने तंदुरुस्ती आणि त्यावरून उठलेल्या विश्रांतीच्या वादळावर थेट भाष्य केले. कोहली म्हणाला, ""तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला विश्रांती आवश्‍यक असते.

कोलकता : भारतीय कर्णधार विराट कोहली याने पुन्हा एकदा आपल्या सहकाऱ्यांना तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देताना मी काही रोबो वगैरे नाही. तुम्ही तपासू शकता. प्रत्येक खेळाडूला विश्रांतीची आवश्‍यकता असते. मलादेखील आहे. योग्य वेळ येईल तेव्हा आपणहून विश्रांतीची मागणी करेन, असे त्याने बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. 

कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने तंदुरुस्ती आणि त्यावरून उठलेल्या विश्रांतीच्या वादळावर थेट भाष्य केले. कोहली म्हणाला, ""तीनही प्रकारचे क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला विश्रांती आवश्‍यक असते. मला पण आहे. मी काही रोबो नाही. आम्हीदेखील थकतो. त्यामुळेच निवड समितीने खेळाडूंना विश्रांती देण्याचे राबविलेले धोरण योग्यच आहे. हार्दिक पंड्याला याच कारणामुळे विश्रांती देण्यात आली. त्याने तशी मागणी केली होती. मीदेखील योग्य वेळी विश्रांती घेईन.'' 

भारतीय संघाला पावसामुळे आज सरावाची संधी मिळाली नाही. त्यामुळे कोहली थेट पत्रकार परिषदेतच आला. हवामान खात्यानेही आगामी दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi sports news virat kohli says i'm not a robot