मिचेल "अ' संघाचा कर्णधार

वृत्तसंस्था
गुरुवार, 31 मे 2018

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया "अ' संघाचे नेतृत्व अष्टपैलू मिचेल मार्श याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या संघात ऍश्‍टन एजर, मॅट रेनशॉ, जॉन हॉलंड, पीटर हॅंड्‌सकॉंब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.
 

सिडनी - भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया "अ' संघाचे नेतृत्व अष्टपैलू मिचेल मार्श याच्याकडे सोपविण्यात आले आहे. या संघात ऍश्‍टन एजर, मॅट रेनशॉ, जॉन हॉलंड, पीटर हॅंड्‌सकॉंब, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश आहे.

हा संघ ऑगस्ट महिन्यात विजयवाडा येथील तिरंगी स्पर्धेत सहभागी होईल. यात भारत "अ' व दक्षिण आफ्रिका "अ' संघ असेल. त्यानंतर चार दिवसांचे दोन सामने विशाखापट्टणमला सप्टेंबरमध्ये होतील. टीम पेन याचा सहायक अर्थात उपकर्णधार म्हणून मिचेल याच्या नावाला माजी कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याच्यासह काही प्रमुख खेळाडूंनी पसंती दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marsh is captain for australia A team