Video : न्यूझीलंडच्या खेळाडूने चहलला शिवी दिली अन्...

वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

भारताविरुद्धचा दुसरा टी-20 सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला शिवी दिली. गुप्टीलने चक्क लाइव्ह शो सुरू असतानाच शिवी दिल्यानंतर रोहित शर्मा तोंडावर हात ठेवून पळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑकलंड : भारताविरुद्धचा दुसरा टी-20 सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला शिवी दिली. गुप्टीलने चक्क लाइव्ह शो सुरू असतानाच शिवी दिल्यानंतर रोहित शर्मा तोंडावर हात ठेवून पळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकून 2-0 ने आघाडी घेतली. दुसरा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. तेव्हा युझवेंद्र चहल माइक घेऊन मार्टिन गुप्टिलकडे गेला. तेव्हा चहलने कसा आहेस असा प्रश्न विचारला. हिंदीत विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देत असताना मार्टिन गुप्टिलने शिवी दिली. त्यावेळी शेजारी असलेला रोहित शर्माला धक्काच बसला. तो थेट तोंडावर हात ठेवून तिथून पळाला.

IndvsNZ : दुसरा सामना जिंकत के एल राहुलचे अनोखे दोन विक्रम

गुप्टिलने शिवी देताच चहलने सांगितलं, माइक सुरु आहे आणि शो लाइव्ह सुरू आहे. मात्र तोपर्यंत फारच उशिर झाला होता. तत्पूर्वी, भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. आजच्या सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा दिसला. भारताच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. त्यानंतर भारताने सहज विजय मिळवला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: martin guptil abuse yuzvendra chahal after second T-20 match