World Cup 2019 : हा ठरला यंदाचा सर्वांत अपयशी सलामीवीर

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

वर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या फलंदाजांची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र, याला न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल अपवाद ठरतो. तो यंदाच्या स्पर्धेतील सर्वाधिक अपयशी सलामीचा फलंदाज आहे.

वर्ल्ड कर स्पर्धेत त्याला 186 धावाच करता आल्या. दोन वेळा तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. तीन सामन्यात त्याला दुहेरी मजलही मारता आली नाही.

गेल्या स्पर्धेत द्विशतकी खेळीसह गुप्टिलने 547 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत 10 सामने खेळताना त्याची सरासरी 20.66 राहिली. यात पहिल्या सामन्यातील 73 धावांची खेळी वगळली, तर त्याची सरासरी 12.55 दाखवते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: martin guptill becomes the most failed opener of world cup 2019