World Cup 2019 : विजय शंकरच्या जागी मयांक अग्रवाल?

वृत्तसंस्था
Monday, 1 July 2019

मयांक अगरवालचे नशीब खरंच विचित्र आहे. त्याला दरवेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच संघाची दारं उघडतात. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने पृथ्वी शॉला दुखापत झाल्यावर संघात स्थान मिळवले होते. आता विश्वकरंडकात पदार्पण करण्याची संधी दारं ठोठावतं आहे. विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याला विश्वकरंडकातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

वर्ल्ड कप 2019 : मयांक अगरवालचे नशीब खरंच विचित्र आहे. त्याला दरवेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच संघाची दारं उघडतात. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने पृथ्वी शॉला दुखापत झाल्यावर संघात स्थान मिळवले होते. आता विश्वकरंडकात पदार्पण करण्याची संधी दारं ठोठावतं आहे. विजय शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याला विश्वकरंडकातून माघार घ्यावी लागली आहे. त्याच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध संघांत समावेश होऊनही मयांकला अंतिम संघात स्थान मिळू शकले नव्हते. त्या कसोटी मालिकेत पृथ्वी शॉने पदापर्ण केले आणि पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकाविले. कसोटीमध्ये सलामीला चांगला पर्याय मिळाला असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात पृथ्वी शॉच्या पायाला दुखापत झाली आणि मयांकसाठी कसोटी संघाचे दरवाजे उघडले गेले. आताही शंकरला दुखापत झाल्यामुळे त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.  

कर्नाटककडून खेळताना 2017-18 च्या रणजी स्पर्धेत त्याने आठ सामन्यांमध्ये 105.45 च्या सरासरीने 1160 धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या 304 नाबाद अशी आहे. त्याने केवळ एका महिन्याच्या कालावधीत हजारपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. 

तसेच 2017-18 मध्ये झालेल्या विजय हजारे करंडकात त्याने आठ सामन्यांमध्ये 90.37 च्या सरासरीने 723 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत. याचसह त्याने सचिन तेंडुलकरचा प्रथम श्रेणी स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला. सचिनने 2003 मध्ये 673 धावा केल्या होत्या. 

यंदाच्या वर्षात भारत अ संघाकडून खेळताना त्याने इंग्लंडविरुद्ध सहा सामन्यांमध्ये 442 धावा केल्या. भारत अ संघाकडून 2018मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केला. त्याने केलेल्या 442 धावांमध्ये तीन शतकांचा समावेश होता. तसेच दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध त्याने 375 धावा केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayank Agarwal likely to replace Vijay Shankar in World Cup squad