"एमसीए'देखील राहणार पुरस्कार सोहळ्यापासून दूर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाने सर्वोत्तम क्रिकेट संघटना म्हणून गौरवण्यात आलेली मुंबई क्रिकेट संघटना (एमसीए) देखील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यापासून दूर राहिली. बंगळूर येथे आज संपन्न होत असलेल्या या सोहळ्यात कर्नाटकने यापूर्वीच बहिष्कार टाकला आहे.

सर्वोत्तम संघटनेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबई संघटनेचा एकही पदाधिकारी बंगळूरला जाणार नसल्याचे संघटनेचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. शेट्टी यांनी सांगितले. आमचा या सोहळ्यावर बहिष्कार नाही; पण कोणीही उपस्थित राहणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या सोहळ्यापासून दूर राहण्याच्या निर्णयामुळे काही सदस्य नाराज आहेत. मुंबई खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीचा, यशाचा गौरव होणार आहे. त्या वेळी त्या सोहळ्यापासून दूर राहणे चुकीचे आहे, असेही मत काही सदस्यांनी व्यक्त केले.

Web Title: mca will away from award event