Ashes 2019 : संघात स्थान न दिल्याने मोईन अलीचा अनिश्चित काळासाठी ब्रेक

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला. 

लंडन : इंग्लडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने अनिश्चित काळासाठी ब्रेकवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नाही म्हणून त्याने हा निर्णय घेतला. 

ऍशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. 

मालिकेतील पहिला सामना गमाविल्यानंतर केवळ दोनवेळाच इंग्लंडला ऍशेस मालिका जिंकता आली आहे. बोथमच्या अष्टपैलू कामगिरीने 1981 आणि त्यानंतर 2005 मध्ये इंग्लंडने अशी कामगिरी केली आहे. जेम्स अँडरसनची उणिव त्यांना भासत असली, तरी आर्चरचा समावेश करून ती भरून काढण्याचा इंग्लंडचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर इंग्लंडला फलंदाजांकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Moeen Ali to take short break after Lord's axing