अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक उत्तेजक सेवन चाचणीत दोषी

रॉयटर्स
शनिवार, 15 एप्रिल 2017

दुबई - अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज महंमद शहजाद उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याला तात्पुरते निलंबित केले आहे.

दुबई - अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज महंमद शहजाद उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्याला तात्पुरते निलंबित केले आहे.

आयसीसीच्या वतीने जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या चाचणीत तो दोषी आढळला आहे. त्याच्या "अ' नमुन्याच्या चाचणीत त्याने क्‍लेन्बुटेरॉल हे बंदी घातलेले औषध घेतल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नियमानुसार त्याला तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन 26 एप्रिलपासून लागू होईल. या तारखेपूर्वी त्याला आपल्यावरील कारवाईला आव्हान देण्याची परवानगी आहे.

शहजाद अफगाणिस्तानकडून 58 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला आहे. त्याला उत्तेजक घेतल्याचे जाहीर झाल्यापासून पाच दिवसांच्या आत "ब' नमुन्याच्या चाचणीची मागणी करता येऊ शकते. त्यानंतर निलंबनाला आव्हान देण्यासाठी त्याच्या हातात 12 दिवस आहेत. या बारा दिवसांत त्याने आव्हान दिल्यास त्याच्यावरील तात्पुरती बंदी ही चौकशीचा निर्णय होईपर्यंत उठू शकते. चौदा दिवसांत त्याने कारवाईला आव्हान दिले नाही, तर आयसीसी त्याला गुन्हा मान्य असल्याचे गृहित धरून त्याच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.

Web Title: mohammad shahzad is stimulating consumption guilty in a trial