वर्ल्ड कपमधील 'त्या' गोष्टीचा आजही पश्चाताप होतो : धोनी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 January 2020

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडकात झालेल्या उपांत्य सामन्यात झालेल्या नआऊटचा आजही पश्चाताप होतो अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वकरंडकात झालेल्या उपांत्य सामन्यात झालेल्या नआऊटचा आजही पश्चाताप होतो अशा शब्दांत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या भावना व्यक्त केल्या

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विश्वकरंडकाच्या सहा महिन्यानंतर धोनीने उपांत्य सामन्यात धावबाद झाल्याचा पश्चाताप होत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, ''माझ्या पहिल्या सामन्यातही मी धावबाद झालो होतो आणि या सामन्याही मी धावबाद झालो. आजही मी स्वत:ला विचारत राहतो की मी त्यादिवशी उडी मारुन धाव पूर्ण कण्याचा प्रयत्न का नाही केला? अजूनही मला वाटत राहते की मी त्या दोन इंचांसाठी उडी मारायला हवी होती.''

Image result for dhoni on World Cup run out

विश्वकरंडकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची चार बाद 24 अशी दुरावस्था झाली होती. धोनी मैदानावर असताना भारताला विजयासाठी 12 चेंडूंत 31 धावांची गरज होती. 49व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धोनीने षटकार मारला. पुढचा चेंडू निर्धाव गेल्यावर पुढच्या चेंडूवर दुसरी धाव घेतना धोनी धावबाद झाला. भारताने हा सामना 18 धावांनी गमावला.

पहिल्या दिवशी तान्हाजीपेक्षा 'या' चित्रपटाने केली तिप्पट कमाई

या सामन्यानंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेऊन आधी लष्करात सेवा केली. त्यानतंर तो अमेरिकेत सुटीवर गेला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni breaks his silence on heartbreaking run-out in World Cup 2019