कॅप्टन कूल माहीचा आज वाढदिवस; शुभेच्छांचा वर्षाव

Saturday, 7 July 2018

धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवरून त्याच्यासोबतचे व्हिडिओ, फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) 37व्या वर्षात पदार्पण केले. धोनीने 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकर्दीला सुरुवात केली आणि आज 14 वर्षांनंतरही त्याची संघातील जागा अढळ आहे. 

शुक्रवारी (6 जुलै) इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा बहुमान मिळवला. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यानंतर भारताकडून 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू आहे. महेंद्रसिंह धोनी हा आयसीसीच्या तिन्ही करंडक जिंकणारा क्रिकेटविश्वातील एकमेव कर्णधार आहे. 

धोनीच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्विटरवरून त्याच्यासोबतचे व्हिडिओ, फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni celebrates his 37th birthday