अन् धोनीने विमानतळावरच मारली पडी!

वृत्तसंस्था
Monday, 18 September 2017

विमानतळावर कर्णधार विराट कोहली, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे मांडी घालून बसल्याचे दिसत आहे. तर, धोनीने आपली बॅग डोक्याखाली घेत पडी मारली. बीसीसीआयनेही खेळाडू रिलॅक्स मडूमध्ये असल्याचे ट्विट केले आहे.

चेन्नई - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीने चेन्नईतून निघताना विमानाची वेळ होईपर्यंत चक्क विमानतळावर फरशीवर पडी मारली.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात धोनीने केलेल्या अर्धशतकी खेळीचा भारताच्या विजयात उपयुक्त वाटा होता. धोनीने धाव घेताना केदार जाधवकडे ज्या पद्धतीने बघितले ते सोशल मिडीयात व्हायरल होत असताना आता तो चक्क विमानतळावरच झोपल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) हे फोटो ट्विटरवरून प्रसिद्ध केले आहेत. भारतीय संघ दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कोलकताकडे रवाना होत असताना अनेक खेळाडू विमानतळावर निवांत दिसले.

विमानतळावर कर्णधार विराट कोहली, के. एल. राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह हे मांडी घालून बसल्याचे दिसत आहे. तर, धोनीने आपली बॅग डोक्याखाली घेत पडी मारली. बीसीसीआयनेही खेळाडू रिलॅक्स मडूमध्ये असल्याचे ट्विट केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Takes to Airport Floor to Rest After Match-winning Knock in Chennai