'आयपीएल'च्या गुणतक्‍त्यात मुंबई इंडियन्स तळाशीच!

वृत्तसंस्था
Tuesday, 17 April 2018

मुंबई : 'इंडियन प्रीमिअर लीग'च्या पहिल्या 13 सामन्यांनंतर गतविजेते मुंबई इंडियन्स अजूनही गुणांचा भोपळा फोडू शकलेले नाहीत. यामुळे आज (मंगळवार) होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यामध्ये घरच्या मैदानावर विजय मिळवून खाते उघडण्यास रोहित शर्माचा संघ उत्सुक आहे. 

गतविजेते मुंबई इंडियन्स गुणतक्‍त्यात सध्या तळाशी आहेत. त्यांना पहिले तीनही सामने गमवावे लागले आहेत. चारपैकी एक सामना जिंकून गौतम गंभीरचा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. 

स्पर्धेला सुरवात होण्यापूर्वीच कर्णधार डेव्हिड वॉर्नरला गमवावे लागले असले, तरीही सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यंदाचे पहिले तीनही सामने जिंकत गुणतक्‍त्यात आघाडी घेतली आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी आतापर्यंत दोन विजय आणि एक पराभव अशी कामगिरी केली आहे. 

स्पर्धेतील पहिल्या 13 सामन्यांनंतरचा गुणतक्ता

संघ सामने विजय पराभव गुण निव्वळ धावगती
सनरायझर्स हैदराबाद 3 3 0 6 0.772
कोलकाता नाईट रायडर्स 4 2 2 4 0.863
किंग्ज इलेव्हन पंजाब 3 2 1 4 0.116 
चेन्नई सुपर किंग्ज 3 2 1 4 0.103
राजस्थान रॉयल्स 3 2 1 4 -0.247
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 3 1 2 2 -0.373
दिल्ली डेअरडेव्हिल्स 4 1 3 2 -1.399
मुंबई इंडियन्स 3 0 3 0 -0.174

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Indians at bottom of points table after 13 games in IPL