मुंबईचा आज पंजाबशी सामना 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई : सलग चार विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमध्ये लय सापडलेल्या मुंबई इंडियन्सचा उद्या सलग तीन पराभव झालेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना होत आहे. मुंबई संघाचे पारडे जड असले, तरी गाफील न राहता आपली स्थिती अधिक भक्कम करण्यावर त्यांचा भर असेल. 

पुण्याविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रुळावर आली आहे. एकतर्फी विजय मिळवता आले नसले, तरी कठीण प्रसंगातून त्यांनी मार्ग काढत विजयी मालिका कायम ठेवली; परंतु निव्वळ सरासरी सुदृढ नसल्यामुळे सध्या ते दुसऱ्या स्थानावर आहेत. 

प्रत्येक सामन्यागणिक मुंबईचा भरवशाचा एकेक फलंदाज फॉर्मात येत आहे. बंगळूरविरुद्ध पोलार्डची बॅट तळपली होती, तर वानखेडेवर गुजरातविरुद्ध रोहित शर्माच्या बॅटमधून धावा निघाल्या होत्या. नितीश राणा, हार्दिक व कुणाल पंड्या या युवकांनी प्रत्येक सामन्यात योगदान दिले आहे. आता पार्थिव पटेल व जोस बटलर या सलामीवीरांना फॉर्म मिळण्याची वेळ आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांचा कल संघात बदल करण्याकडे नसला, तरी बटलरऐवजी लेंडल सिमन्सला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. 

पाचपैकी चार सामन्यांतील विजयात मुंबई इंडियन्सची गोलंदाजी निर्णायक ठरलेली आहे. गुजरातविरुद्ध बुमरा आणि मलिंगा यांनी अपेक्षेपेक्षा जास्त धावा दिल्या असल्या, तरी मॅक्‍लेंघन, हरभजनसिंग यांनी हातभार लावला होता. मिशेल जॉन्सनला अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे मॅक्‍लेंघनला प्रत्येक सामन्यात प्रभाव पाडावा लागत आहे आणि त्याचा फायदा संघालाच होत आहे. 

पंजाबकडे कर्णधार ग्लेन मॅक्‍सवेलसह डेव्हिड मिलर व इऑन मॉर्गन असे एकापेक्षा एक सरस आक्रमक शैलीचे आंतरराष्ट्रीय फलंदाज आहेत; परंतु एकालाही अजून लौकिकाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. दोन दिवसांपूर्वीच्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मनन व्होरा एकाकी लढत असताना इतरांची त्याला साथ लाभली नव्हती. मुंबईचे गोलंदाज याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.

Web Title: Mumbai Indians to face Kings XI Punjab in IPL 10