मुंबईची पराभवाची हॅट्‌ट्रिक

वृत्तसंस्था
Sunday, 15 April 2018

मुंबई - गतविजेते आणि यंदा सलग तीन सामन्यांत पराभव. १९४ धावाही पुरेशा ठरल्या नाहीत. पहिल्या सामन्यात शेवटून दुसऱ्या चेंडूवर, तर गेल्या दोन सामन्यांत अखेरच्या चेंडूवर हार... ही मुंबई इंडियन्सची गेल्या तीन सामन्यांतली कहाणी. आयपीएलमधील सर्व संघांनी खाते उघडले; परंतु मुंबई संघाच्या समोर अजूनही भोपळाच आहे. दिल्लीने आजचा सामना सात विकेटने जिंकला.

आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई संघाची फलंदाजी बहरली, १९४ अशी भक्कम धावसंख्या उभारली; पण आज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी निराशा केली. परिणामी आणखी एक पराभव पदरी आला. इंग्लिश फलंदाज जेसन रॉयने नाबाद ९१ धावांचा तडाखा देत मुंबई संघाचे मनसुभे उधळले.

प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबई संघाने फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केला आणि एविन लुईससह रोहितऐवजी सूर्यकुमार यादवला  सलामीला पाठवले, या दोघांनी सात षटकांत १०२ धावांची सलामी दिली तेव्हा सव्वादोनशे धावा अपेक्षित होत्या. हे दोघे सलामीवर पाठोपाठ बाद झाले तरी इशान किशानने तडाखा कायम ठेवला होता, परंतु अंतिम टप्प्यात मुंबईने पाठापोठ फलंदाज गमावले आणि गाडी अखेर १९४ धावांवर थांबली.

आव्हान मोठे असले तरी दिल्लीने तोडीस तोड सुरवात केली होती. गौतम ‘गंभीर’ झाल्यावर रॉय आणि रिषभ पंत यांनी आव्हान आवाक्‍यात आणले; परंतु सामना अंतिम टप्प्यात आल्यावर चुरस वाढली होती. 

संक्षिप्त धावफलक - 
मुंबई - २० षटकांत ७ बाद १९४ (सूर्यकुमार यादव ५३ -३२ चेंडू, ७ चौकार, १ षटकार, एविन लुईस ४८ -२८ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार, इशान किशान ४४ - २३ चेंडू, ५ चौकार, २ षटकार, बोल्ट २-३९, तेवाटिया २-३६) पराभूत वि. दिल्ली - २० षटकांत ३ बाद १९५ (जेसन रॉय नाबाद ९१ -५३ चेंडू, ६ चौकार, ६ षटकार, रिषभ पंत ४७ -२५ चेंडू, ६ चौकार, २ षटकार, श्रेयस अय्यर नाबाद २७ -२० चेंडू, ३ चौकार, १ षटकार, कुणाल पंड्या २-२१).

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai indians losing hat-trick cricket india