बॅंक गॅरंटी म्हणून दीडशे कोटी भरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

उच्च न्यायालयाचे ‘एमसीए’ला आदेश 

मुंबई  - पुणे स्टेडियमच्या बांधकामप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि शापुरजी पालंजी प्रायव्हेट कंपनी यांच्यात लवादासमोर (आर्ब्रिटरेशन) सुरू असलेला वादावर तोडगा निघेपर्यंत दीडशे कोटी बॅंक गॅरंटी जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमसीए’ला दिले.  

उच्च न्यायालयाचे ‘एमसीए’ला आदेश 

मुंबई  - पुणे स्टेडियमच्या बांधकामप्रकरणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आणि शापुरजी पालंजी प्रायव्हेट कंपनी यांच्यात लवादासमोर (आर्ब्रिटरेशन) सुरू असलेला वादावर तोडगा निघेपर्यंत दीडशे कोटी बॅंक गॅरंटी जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ‘एमसीए’ला दिले.  

पुण्यापासून जवळच असलेल्या गहुंजे येथील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमचे बांधकाम शापुरजी पालंजी अँड कंपनी लिमिटेड (एसपीसीएल) यांनी केले होते. सध्या हे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम या नावाने ओळखले जाते. प्रकरण लवादाकडे पाठवत लवादासमोर तोडगा निघेपर्यंत उच्च न्यायालयाचे निबंधक (हायकोर्ट रजिस्ट्री)मध्ये हे दीडशे कोटी जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्या. अमजद सय्यद यांनी मागील आठवड्यात दिले. 

पुणे न्यायालयाने दिलेल्या आदेशाला ‘एमसीए’ने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. खटला प्रलंबित असेपर्यंत १७२. ३२ कोटी राष्ट्रीयीकृत बॅंकेत एमसीए आणि एसपीसीएल यांच्या एकत्रित खात्यात जमा करण्याचे आदेश २० जानेवारीला पुणे न्यायालयाने क्रिकेट बोर्डाला दिले होते. त्याविरोधात ‘एमसीए’ने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, थकबाकीची रक्कम परत मिळविण्यासाठी ‘एसपीसीएल’ने पुणे न्यायालयाने आर्बिटरेशन कायद्याखाली दाखल केलेला अर्जही मान्य करण्यात आला होता. 

फेब्रुवारी २०१० मध्ये ‘एमसीए’ने ‘एसपीसीएल’ला कामाचे कंत्राट दिले होते. ऑक्‍टोबर २०१२ ‘एमसीए’च्या प्रोजेक्‍ट मॅनेजरने पुणे स्टेडियमला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र जारी केले होते. त्यानंतर मार्च २०१३ मध्ये २३४.१० कोटींचे अंतिम बिल ‘एमपीसीएल’ने एमसीएला पाठविले होते.

Web Title: mumbai news Make up 1.5 crore as a bank guarantee by mca