सिद्धेशचा शतकी प्रतिकार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मुंबई - दोन महिन्यांपूर्वी सिद्धेश लाडने दमदार शतकी खेळी करीत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध आघाडी मिळवून दिली होती. आता याच मध्य प्रदेशातील शाहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर लाडच्या शतकाने मुंबईला प्रतिकूल परिस्थितीत सावरले. 

मुंबई - दोन महिन्यांपूर्वी सिद्धेश लाडने दमदार शतकी खेळी करीत मुंबईला मध्य प्रदेशविरुद्ध आघाडी मिळवून दिली होती. आता याच मध्य प्रदेशातील शाहीद वीर नारायण सिंग क्रिकेट स्टेडियमवर लाडच्या शतकाने मुंबईला प्रतिकूल परिस्थितीत सावरले. 

लाडने नाबाद शतकी खेळी करताना अभिषेक नायर आणि कर्णधार आदित्य तरेच्या साथीत हैदराबादला जोरदार सुरवातीनंतर वर्चस्वापासून रोखले. मुंबईने चार बाद 34वरून पहिल्या दिवसअखेर पाच बाद 250पर्यंत मजल मारली. सिद्धेशने मैदानात उतरल्यानंतर झालेल्या 216 धावांपैकी 101 धावा केल्या आहेत. त्याने कर्णधार तरेसह पाचव्या विकेटसाठी 105 आणि अभिषेक नायरसह सहाव्या विकेटसाठी नाबाद 111 धावा जोडल्या आहेत. 

खेळपट्टी आव्हानात्मक होती. शॉर्ट ऑफ गुड लेंथ ठिकाणी हिरवळ होती; तर अन्य ठिकाणी खेळपट्टीवर गवताचे पाते नव्हते. त्यामुळे चेंडू प्रसंगी उसळत होता; तसेच अचानक खालीही राहत होता. या खेळपट्टीवर लाडने दाखवलेली जिगर जबरदस्त होती. 

सूर्यकुमार यादव बाद झाल्यावर मैदानात उतरलेल्या लाडने कर्णधार तरेच्या सहकाऱ्याची भूमिका बजावली. चहापानानंतर छान आक्रमण करणारा तरे परतल्यावर लाडने सूत्रे हाती घेतली. त्याने नायरच्या तोडीस तोड धावा केल्या. वेगवान गोलंदाजी जास्त भेदक होत आहे हे पाहिल्यावर लाडने फिरकीस लक्ष्य केले. 35, 46; तसेच 89 धावांवर लाभलेल्या जीवदानाचा त्याने फायदा घेत मोसमातील दुसरे शतक केले. 

प्रथम फलंदाजीचा मुंबईचा निर्णय धाडसीच होता. असमान चेंडू उसळणाऱ्या खेळपट्टीवर क्वचितच यशस्वी ठरणारे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. श्रेयस अय्यरही धावा करू शकला नाही. त्यातच सूर्यकुमार यादव खराब फटक्‍यावर बाद झाला, त्यामुळे शंभरीही अवघड वाटत होती; पण लाडने एकट्यानेच शतक करीत हैदराबादवरील दडपण वाढवले. 

संक्षिप्त धावफलक ः मुंबई, पहिला डाव ः 5 बाद 250 (केविन अल्मेडा 9, प्रफुल वाघेला 13, आदित्य तरे 73, सिद्धेश लाड खेळत आहे 101 - 196 चेंडूंत 15 चौकार व 1 षटकार, अभिषेक नायर खेळत आहे 46, सीव्ही मिलिंद 3-64 महंमद सिराज 2-58). 

Web Title: mumbai ranji