मुंबईच्या रणजी संघात सलामीवीर अल्मेडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

मुंबई - मुंबई रणजी संघात सलामीवीर केविन डी अल्मेडा याचा समावेश करण्यात आला आहे. अरमान जाफर सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे केविनला संधी मिळाली आहे.

अरमानने सहा डावांत 44 धावाच केल्या, त्यामुळे त्याच्याऐवजी केविनला संधी देण्यात आली. त्याने पुरुषोत्तम ढाल स्पर्धेत नुकतेच त्रिशतक केले आहे. शुभम रांजणे दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे, हेच अखिल हेरवाडकरबाबतही घडले आहे. त्याचबरोबर अजिंक्‍य रहाणेही अजून पूर्ण तंदुरुस्त नसल्यामुळे खेळणार नाही.

जय बिस्ता, तसेच कौस्तुभ पवार या अपयशी सलामीवीरांमुळे प्रफुल वाघेला यासही संधी मिळाली आहे. धवल कुलकर्णी अद्याप गुडघा दुखापतीतून बरा झाला नसल्यामुळे रॉयस्टन डायस संघात आला आहे.

मुंबई संघ - आदित्य तरे (कर्णधार), अभिषेक नायर, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, प्रफुल वाघेला, केविन डी अल्मेडा, शार्दुल ठाकूर, बलविंदर सिंग संधू (ज्युनि.), तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस, सुफियान शेख, विजय गोहील, अक्षय गिरप, एकनाथ केरकर.

Web Title: Mumbai's Ranji Trophy opener Alameda

टॅग्स