उपाहारापूर्वी विजय बाद; भारत भक्कम स्थितीत 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

रांची : मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजारा यांनी संथ आणि संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताला भक्कम स्थितीत नेले. या दोघांनी तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्रात पूर्ण वर्चस्व राखले.

उपाहारापूर्वीच्या शेवटच्या षटकात स्टीव्ह ओकीफला षटकार खेचण्याच्या प्रयत्नात मुरली विजय बाद झाला. उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारताने दोन गडी गमावून 193 धावा केल्या होत्या. चेतेश्‍वर पुजारा 40 धावांवर खेळत होता, तर विजय 82 धावा करून बाद झाला. 

रांचीतील खेळपट्टी फलंदाजीसाठी अद्याप पोषक आहे. या खेळपट्टीवर पुजारा आणि विजय यांनी जम बसविला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केल्याने सुरवातीच्या दीड तासांत भारताच्या फारशा धावा झाल्या नाहीत. त्यानंतर विजय आणि पुजाराने धावांचा वेग काहीसा वाढविला.

मात्र, संपूर्ण सत्रात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांसाठी झगडण्यास भाग पाडले. तरीही पुजारा-विजय यांनी आणखी एक शतकी भागीदारी रचत भारताचा स्कोअरबोर्ड हालता ठेवला. 

उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा भारत पहिल्या डावात 258 धावांनी पिछाडीवर होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 451 धावा केल्या होत्या. चार सामन्यांच्या मालिकेत सध्या 1-1 अशी बरोबरी आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्यास बॉर्डर-गावसकर करंडक ऑस्ट्रेलियाकडेच राहणार आहे. त्यामुळे सामन्यावर वर्चस्व मिळविण्याच्या दृष्टीने भारतासाठी आजच्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा आहे.

Web Title: Murli Vijay Virat Kohli Cheteshwar Pujara India versus Australia