मुस्तफिझूरला टी-20 लीग खेळण्यास मनाई 

वृत्तसंस्था
Sunday, 22 July 2018

ढाका- परदेशातील विविध टी-20 लीगमध्ये खेळल्यामुळे वारंवार दुखापतींचा सामना करावा लागत असलेला वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रेहमानला पुढील दोन वर्षांसाठी कोणत्याही लीगमध्ये खेळण्यास बांगलादेशने मज्जाव केला आहे. बांगलादेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष नझामुल हसन यांनी हा निर्णय घेतला आहे.

मुस्तफिझूर हा बांगलादेशचा सर्वांत हुकमी वेगवान गोलंदाज आहे; परंतु वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे त्याला देशाकडून खेळणे अवघड होत आहे. आतापर्यंत त्याला केवळ 10 कसोटी, 27 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामनेच खेळता आलेले आहेत. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळू शकला नाही.

ही मालिका बांगलादेशने 0-2 अशी गमावली. त्याअगोदर अफगाणिस्तानविरुद्धची मालिका बांगलादेशने 0-3 अशी गमावली. त्यामध्येही मुस्तफिझूर अनुपस्थित होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mustafizur Rahman Will Not be Allowed to Play in Foreign T20 Leagues