वॉर्न, मुरलीधरनपेक्षा लिऑन भेदक

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

लिऑनने यापूर्वी 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू लान्स क्लुजनरचा विक्रम मोडीत काढला. क्लुजनरने 64 धावांत 8 विकेट घेतल्या होत्या. 

बंगळूर - ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लिऑनने आज (शनिवार) भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 50 धावांत 8 विकेट घेत भारतात सर्वाधिक बळी घेणाऱ्या परदेशी क्रिकेटपटूचा मान मिळविला आहे. याबरोबरच लिऑन भारताविरोधात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटपटू ठरला आहे.

बंगळूरमध्ये आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लिऑनच्या फिरकीपुढे भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. लिऑनने 50 धावांत 8 विकेट मिळविल्याने भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावांत आटोपला. लिऑनने यापूर्वी 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू लान्स क्लुजनरचा विक्रम मोडीत काढला. क्लुजनरने 64 धावांत 8 विकेट घेतल्या होत्या. 

लिऑनच्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट यापूर्वी ब्रेट लीने घेतल्या आहेत. आता लिऑन ब्रेट लीला मागे टाकत भारताविरुद्धचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला आहे. ब्रेट लीने 53 विकेट घेतल्या होत्या. 

Web Title: Nathan Lyon best bowling by a touring player in India