लायनच्या बोटाला दुखापत; पण खेळण्याचा विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

रांची - ऑस्ट्रेलियाचा हुकमी ऑफस्पिनर नॅथन लायनच्या उजव्या हाताच्या बोटाची त्वचा खराब झाली आहे; परंतु तरीही गुरुवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याचा विश्‍वास त्याने व्यक्त केला. बंगळूर येथील दुसऱ्या सामन्यातच त्याला हा त्रास जाणवत होता.

वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क दुखापतीमुळे मायदेशी परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ अगोदरच अडचणीत आला आहे. यंदाच्या मोसमात मी खूप गोलंदाजी केली आहे. अशा प्रकारे अतिरिक्त चेंडू टाकावे लागल्यावर वर्षभरात असा त्रास दोनदा तरी होत असतो. कधी कधी वेदना होत असतात, असे लायनने सांगितले.

उजव्या हाताने गोलंदाजी करत असल्यामुळे मला या बोटावर नियमाप्रमाणे पट्टीही लावता येत नाही. 2013 च्या भारत दौऱ्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात असाच त्रास जावणत होता; पण त्यानंतरही तीन दिवसांनंतर मी खेळलो होतो. त्यामुळे आताही मी खेळू शकेन, असा विश्‍वास लायनने व्यक्त केला.

Web Title: nathan lyon injured