भारत सर्वबाद 318; न्यूझीलंडची फलंदाजी सुरू

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016

न्यूझीलंडकडून फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी मिळून प्रत्येकी पाच गडी बाद केले. पण ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देत नाही. तरीही अशी कामगिरी! इंटरेस्टिंग आहे..!
- आकाश चोप्रा, माजी कसोटीपटू

कानपूर : फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात सावध आणि तंत्रशुद्ध फलंदाजी केली. कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर टॉम लॅथम यांनी जवळपास 12 षटके भारतीय आक्रमण व्यवस्थित खेळून काढले. उपाहाराला खेळ थांबला, तेव्हा न्यूझीलंडने 21 षटकांत एक गडी गमावून 71 धावा केल्या होत्या. विल्यमसन 21, तर लॅथम 25 धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 318 धावांत संपुष्टात आला.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी काल (गुरुवार) खेळ थांबला, तेव्हा भारताने नऊ गडी गमावून 291 धावा केल्या होत्या. त्यानंतर जडेजाने आज सकाळपासूनच धडाक्‍यात सुरवात केली. कालचा नाबाद फलंदाज उमेश यादवने त्याच्या वैयक्तिक धावसंख्येत केवळ एकाच धावेची भर घातली; तर फटकेबाजी करणारा जडेजा 42 धावांवर नाबाद राहिला.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सावध सुरवात केली. मार्टिन गुप्टीलच्या अपयशाची मालिका कायम राहिली. डावाच्या दहाव्या षटकात उमेश यादवच्या गोलंदाजीवर गुप्टील पायचीत झाला. त्यानंतर लॅथम आणि विल्यमसनने भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.

धावफलक :
भारत : पहिला डाव :

के. एल. राहुल 32
मुरली विजय 65
चेतेश्‍वर पुजारा 62
विराट कोहली 9
अजिंक्‍य रहाणे 18
रोहित शर्मा 35
आर. आश्‍विन 40
वृद्धिमान साहा 0
रवींद्र जडेजा नाबाद 42
महंमद शमी 0
उमेश यादव 9
अवांतर : 6
गोलंदाजी :

ट्रेंट बोल्ट : 3-67
नील वॅग्नर : 2-42
मिशेल सॅंटनर : 3-94
मार्क क्रेग : 1-59
ईश सोधी : 1-50

न्यूझीलंड : (दुसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत)
मार्टिन गुप्टील 21
टॉम लॅथम खेळत आहे 25
केन विल्यमसन खेळत आहे 21
अवांतर : 4
गोलंदाजी :

महंमद शमी : 0-12
उमेश यादव : 1-8
रवींद्र जडेजा : 0-24
आर. आश्‍विन : 0-23


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Zealand restricts India to 318