पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा संघर्षपूर्ण विजय 

पीटीआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

वेलिंग्टन - न्यूझीलंडवर असलेले पिछाडीचे दडपण झुगारून देत कर्णधार केन विल्यम्सनने दुसऱ्या डावांत केलेल्या नाबाद शतकी खेळीमुळे न्यूझीलंडला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात अखेरच्या दिवशी बांगलादेशावर सात गडी राखून विजय मिळविता आला. 

पहिल्या डावांत बांगलादेशाच्या सहाशे धावांच्या डोंगरासमोर न्यूझीलंडने 539 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावांत मात्र, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशाला 160 धावांत रोखून धरले. बांगलादेशाचा दुसरा डाव उपाहारानंतर संपुष्टात आला. त्यामुळे दीड सत्रात 217 धावांचे आव्हान न्यूझीलंडसमोर होते. 

विजयी आव्हानाचा पाठलाग करताना टॉम लॅथम आणि जीत रावल ही सलामीची जोडी अपयशी ठरली. विल्यम्सन आणि रॉस टेलर या जोडीने 163 धावांची वेगवान भागीदारी करून न्यूझीलंडला विजयाजवळ नेले. विजयासाठी 15 धावांची गरज असताना टेलर बाद झाला. त्या वेळी विल्यम्सनने आपली नाबाद शतकी खेळी साजरी करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक 
बांगलादेश ः 595 आणि 160 (शब्बीर रहमान 50, इम्रुल कायेस 36, ट्रेंट बोल्ट 3-53, मिशेल सॅंटनेर 2-36, नील वॅगनर 2-37) पराभूत वि. न्यूझीलंड 539 आणि 3 बाद 217 (केन विल्यम्सन नाबाद 104, रॉस टेलर 60, हेन्‍री निकोल्स नाबाद 4) 

फिकूर रुग्णालयात 
बांगलादेशाचा कर्णधार मुशफिकूर रहीम याला सोमवारी डोक्‍याला चेंडू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टीम साउदीचा एक उसळता चेंडू मुशफिकूरच्या डोक्‍यावर आदळाला. हेल्मेट असतानाही मुशफिकूरला चेंडू जोरात लागला. आघातानंतर मुशफिकूर मैदानावर थोडा चालला; पण लगेच मैदानावर खाली पडून लोळू लागला. दोन्ही संघाच्या वैद्यकीय स्टाफने मैदानावर त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर त्याला ऍम्बुलन्समधून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो उपचाराला साथ देत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मुशफिकूरने पहिल्या डावात 159 धावांची खेळी केली होती. चेंडू लागला तेव्हा तो 13 धावांवर खेळत होता. त्याला रुग्णालयात नेण्यात येईपर्यंत सामना 15 मिनिटे थांबला होता. 

Web Title: New Zealand won the first Test