लॅथम, मुन्‍रोच्या खेळीने न्यूझीलंडचा सहज विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बांगलादेशाचे गोलंदाज निष्प्रभ
ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) - टॉम लॅथम आणि कॉलिन मुन्‍रो यांच्या दणकेबाज फलंदाजीने न्यूझीलंडने सोमवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशावर 77 धावांनी विजय मिळविला. दिशाहीन गोलंदाजी आणि त्यानंतर मुशफिकूर रहिमला फलंदाजीत भरात असताना दुखापतीने मैदान सोडावे लागल्यामुळे बांगलादेशाचा प्रतिकार अपुरा पडला.

बांगलादेशाचे गोलंदाज निष्प्रभ
ख्राईस्टचर्च (न्यूझीलंड) - टॉम लॅथम आणि कॉलिन मुन्‍रो यांच्या दणकेबाज फलंदाजीने न्यूझीलंडने सोमवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशावर 77 धावांनी विजय मिळविला. दिशाहीन गोलंदाजी आणि त्यानंतर मुशफिकूर रहिमला फलंदाजीत भरात असताना दुखापतीने मैदान सोडावे लागल्यामुळे बांगलादेशाचा प्रतिकार अपुरा पडला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी 7 बाद 341 धावा केल्या. लॅथमने कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळी करताना 137 धावा केल्या. मुन्‍रोने 61 चेंडूंत 87 धावांची खेळी केली. बांगलादेशचा डाव 44.5 षटकांत 9 बाद 264 असा मर्यादित राहिला.

डावाची सुरवात करताना लॅथमने तिसऱ्या षटकांत चौकार खेचला आणि तेव्हापासून सुरू झालेली त्याची फटकेबाजी न्यूझीलंडच्या डावात 48व्या षटकापर्यंत चालूच राहिली. या दरम्यानच्या काळात न्यूझीलंडची सुरवात समाधानकारक नव्हती. मार्टिन गुप्टिल अपयशी ठरला. कर्णधार केन विल्यम्सन (31) स्थिरावल्यानंतर बाद झाला. तोपर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यात 96व्या खेळीत 4 हजार धावांचा टप्पा ओलांडला. नील ब्रूम आणि नीशामही लवकर बाद झाले. त्यामुळे 29 षटकांत न्यूझीलंडचा डाव 4 बाद 158 असा अडचणीत आला होता.

त्याच वेळी एकत्र आलेल्या लॅथम, मुन्‍रो जोडीने सामन्याची समीकरणे बदलली. त्यांनी 30 ते 40 या षटकांदरम्यान 70 धावा कुटल्या. पाचव्या विकेटसाठी या जोडीने 158 धावांची भागीदारी करून न्यूझीलंडचे आव्हान उभे केले.

त्यानंतर बांगलादेशची धडाक्‍यात झालेली सुरवात तेवढ्यापुरतीच थांबली. आठव्या षटकापासून त्यांच्या डावाला गळती लागली. इम्रूल कायेस बाद झाला. पाठोपाठ सरकार आणि महमुदुल्ला एकाच षटकांत बाद झाले. त्यानंतर तमीम इक्‍बाल, शकीब अल हसन आणि मुशफिकूर यांनी छोट्या छोट्या भागीदारी केल्या. चाळिसाव्या षटकापर्यंत त्यांनी न्यूझीलंडच्या धावगतीशी बरोबरी कायम ठेवली होती. पण, त्यांच्या हातात विकेट नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड 50 षटकांत 7 बाद 341 (टॉम लॅथम 137 -121 चेंडू, 7 चौकार, 4 षटकार, कॉलिन मुन्‍रो 87 -61 चेंडू, 8 चौकार, 4 षटकार, केन विल्यम्सन 31, शकीब अल हसन 3-69, टस्किन अहमद 2-70, मुस्तफिझूर रहीम 2-62) वि.वि. बांगलादेश 44.5 षटकांत सर्वबाद 264 (शकीब अल हसन 59, मोसाडेक हुसेन नाबाद 50, मुशफिकूर रहीम 42, जेम्स निशाम 3-36, लॉकी फर्ग्युसन 3-54, टीम साऊदी 2-63)

Web Title: new zeland bangaladesh test cricket match