115 धावा करूनही हुकले शतक

वृत्तसंस्था
Wednesday, 9 January 2019

ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण 115 धावा करूनही तिचे शतक मात्र हुकले आहे. या सामन्यात सोफीने नाबाद 99 आणि सुपर ओव्हरमध्ये नाबाद 16 धावा केल्याने तिच्या या सामन्यात एकूण 115 धावा करूनही तिचे शतक हुकले आहे.

मेलबर्न- ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण 115 धावा करूनही तिचे शतक मात्र हुकले आहे. या सामन्यात सोफीने नाबाद 99 आणि सुपर ओव्हरमध्ये नाबाद 16 धावा केल्याने तिच्या या सामन्यात एकूण 115 धावा करूनही तिचे शतक हुकले आहे.

या सामन्यात हरिकेन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजी करताना सोफीने 53 चेंडूत नाबाद 99 धावा केल्या. सोफीच्या या तुफानी खेळीने स्ट्रायकर्सने हरिकेन्सला 190 धावांचे लक्ष्य दिले होते. पण 20 षटकात हरिकेन्सने 189 धावा केल्याने सामना बरोबरीत राहिला. सुपर ओव्हरमध्ये हरिकेन्सने 13 धावांचे लक्ष्य दिले होते. हे लक्ष यावेळी सोफीने तीन चेंडूमध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No century but 115 runs in a T20 for Sophie Devine