आता इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या खर्चाबाबत प्रश्‍नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांना बीसीसीआयच्या अध्यक्ष आणि सचिवपदावरून दूर केल्यानंतर येत्या काळात कोणीच वरिष्ठ पदाधिकारी नसल्यामुळे इंग्लंडविरुद्धची मर्यादित षटकांच्या मालिका संकटात आली आहे. एकदिवसीय आणि ट्‌वेन्टी-20 मालिकेसाठी इंग्लंडचा संघ आठवडाभरात पुन्हा भारतात येत आहे.

वरिष्ठ उपाध्यक्षांनी अध्यक्षपदाची आणि सहसचिवांनी चिटणीसपदाची जबाबदारी काही काळासाठी घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असले, तरी त्यांच्याकडे घटनात्मक अधिकार नसतील; तसेच या मालिकेसाठी खर्च करण्याचीही परवानगी नसेल.

लोढा शिफारशी स्वीकार करा; तसेच आर्थिक व्यवहार करा, असे न्यायालयाने आदेश दिले होते. त्यामुळे कसोटी मालिकेबाबतही असाच प्रश्‍न निर्माण झाला होता; परंतु न्यायालयानेच नंतर केवळ आयोजनासाठी आवश्‍यक असलेला खर्च करण्यास परवानगी दिली होती. मर्यादित षटकांच्या मालिकेबाबत अजून कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही.

विदर्भ आणि त्रिपुरा या दोनच राज्य संघटनांनी लोढा शिफारशी स्वीकारल्या आहेत. इतर कोणत्याही राज्याने शिफारशी स्वीकारल्या नसल्यामुळे त्यांच्यावरही बंधने आहेत.

इंग्लंडचा संघ भारतात आल्यावर पहिला एकदिवसीय सामना पुण्यात 15 जानेवारीला होत आहे. त्याअगोदर 10 आणि 12 जानेवारीला सराव सामने मुंबईत होत आहेत. या दोन्ही संघटनांचे प्रमुख अजय शिर्के आणि शरद पवार अनुक्रमे महाराष्ट्र संघटनांच्या पदावर नसल्यामुळे इंग्लंड संघाच्या मालिकेच्या खर्चाबाबत प्रश्‍न उभा राहू शकतो.

Web Title: Now England series of questions about costs