"पतौडी'व्याख्यानासाठी आता गांगुली ? 

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

"बीसीसीआय'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक मन्सूर अली खान पतौडी व्याख्यानमालेतील वक्ता कोण? हे अजून ठरलेले नाही.
 

नवी दिल्ली - "बीसीसीआय'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या वार्षिक मन्सूर अली खान पतौडी व्याख्यानमालेतील वक्ता कोण? हे अजून ठरलेले नाही.

"बीसीसीआय'मधील प्रत्येक पदाधिकाऱ्याची यासाठी वेगवेगळ्या खेळाडूला पसंती आहे. हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी केविन पीटरसनचे नाव सुचवले. त्याच वेळी हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी कुमार संगकाराचे नाव सुचवले. या दोन्ही नावांना विरोध होत असताना आता खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी खन्ना यांच्यासह सौरभ गांगुलीचे नाव पुढे आणले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता गांगुलीच्या नावाला प्राधान्य देण्यात येत असून, त्यानंतर पीटरसन, संगकारा आणि नासीर हुसेन असे पर्याय असतील. 

Web Title: now gangly for pataudi speech

टॅग्स