World Cup 2019 : भारतीय संघात एकमेव बदल; पहिल्यांदा करणार गोलंदाजी

वृत्तसंस्था
Tuesday, 9 July 2019

विश्वकरंडकातील पहिल्या सेमी फायनलमध्ये पावसाची सावट डोक्यावर घेत नाणेफेक झाली. किवींने नाणेफेक जिंकत अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला. 

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : विश्वकरंडकातील पहिल्या सेमी फायनलमध्ये पावसाची सावट डोक्यावर घेत नाणेफेक झाली. किवींने नाणेफेक जिंकत अपेक्षेप्रमाणे फलंदाजीचा निर्णय घेतला. 

कोहलीने सामन्याच्या आधी सराव करताना चक्क गोलंदाजीचा सराव केला. इतिहासाची पुनरावृत्ती होऊन कोहली किंवींचा कर्णधार केन विल्यम्सनला बाद करणार का याची उत्सुकता लागली आहे. 

श्रीलंकेविरुद्ध असलेल्या भारतीय संघात एकच बदल करण्यात आलेला आहे. कुलदीप यादवच्याऐवजी युझवेंद्र चहलला संघात स्थान देण्यात आले.  

 

न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसन तंदुरुस्त झाल्याने त्याने संघात पुनरागमन केले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांनी विश्वकरंडकात आजवर सात सामने खेळले आहेत. यापैकी तीन सामन्यांत भारताने तर चार सामन्यांत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NZ Won the toss and elected bat frist