वन-डेमध्ये रोहितची विक्रमी कामगिरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

गुवाहटी - विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळविला. अनेक विक्रम या जोडीने मोडले. मात्र, रोहितने विशेष चमक दाखवताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी दीडशतकी खेळी केली. या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकले. या दोघांनी यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाच दीडशतकी खेळी केल्या होत्या.

क्रिकेटविश्‍वातील सर्वोत्तम नऊ देशांविरुद्ध शतक, अशी कामगिरी यापूर्वी सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, हर्शेल गिब्ज, हशिम आमला, विराट कोहली, रॉस टेलर, एबी डिव्हिलर्स, मार्टिन गुप्टिल, उपुल थरंगा यांच्या नावावर

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १९४ षटकार. सौरभ गांगुलीला (१८९) टाकले मागे. भारताकडून सर्वाधिक षटकार धोनी (२१०) आणि सचिन तेंडुलकरचे (१९५)

Web Title: One Day Cricket Match Rohit Sharma Record