कोहली, रोहितचा तडाखा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 October 2018

गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली आणि रोहितच्या शतकी खेळीने आरामात विजयी लक्ष्य गाठताना षटकांत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ धावा केल्या.

गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला.
प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली आणि रोहितच्या शतकी खेळीने आरामात विजयी लक्ष्य गाठताना षटकांत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ धावा केल्या.

विंडीज फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवत तीनशेपार धावसंख्या नेली; पण त्यांचे गोलंदाज भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीला रोखू शकले नाहीत. दोघांनी द्विशतकी भागीदारी करताना चौकार, षटकारांची बरसात करताना प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. धवनला लवकर बाद केल्याचा विंडीजचा आनंद तेवढ्यापुरताच टिकला. त्यानंतर रोहित, विराट यांनी धावांचा सपाटा लावला तेव्हा विंडीजची गोलंदाजी अक्षरशः सुमार ठरली आणि इथेच त्यांनी सामना गमावला. कोहली १४० धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहितने १५२ धावांवर नाबाद राहताना अंबाती रायुडूच्या साथीत भारताचा विजय साकार केला. कोहलीच्या खेळीत २१ चौकार, २ षटकार; तर रोहितच्या खेळीत १५ चौकार आणि आठ षटकारांचा समावेश होता. 

तत्पूर्वी, शिमरन हेटमेयरच्या (१०६) शतकी खेळीमुळे डळमळीत सुरवातीनंतरही विंडीजला भारतासमोर तगडे आव्हान उभे करता आले होते. १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत विंडीजच्या विजेतेपदाचा शिल्पकार ठरलेल्या २१ वर्षीय हेटमेयरने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ७८ चेंडूंत आपली खेळी ६ चौकार आणि ६ षटकारांसह सजविली. त्याचे हे तिसरे शतक ठरले.

संक्षिप्त धावफलक -
वेस्ट इंडीज ५० षटकांत ८ बाद ३२२ (शिमरन हेटमेयर १०६ (७८ चेंडू, ६ चौकार, ६ षटकार), किएरॉन पॉवेल ५१, शई होप ३२, जेसन होल्डर ३८, देवेंद्र बिशू नाबाद २२, केमार रॉच नाबाद २६, युजवेंद्र चहल ३-४१, रवींद्र जडेजा २-६६, महंमद शमी २-८१). पराभूत वि. भारत ४२.१ षटकांत २ बाद ३२६ (रोहित शर्मा नाबाद १५२ (११७ चेंडू, १५ चौकार, ८ षटकार), विराट कोहली १४० (१०७ चेंडू, २१ चौकार, २ षटकार), अंबाती रायुडू २२)

भारत विजय वैशिष्ट्ये
    कोहली-रोहित शर्माची पाचवी द्विशतकी भागीदारी
    कर्णधार असताना कोहलीचे १४ वे वन-डे शतक, या क्रमवारीत एबी डिव्हिलर्सला मागे टाकले
    कोहलीचे यंदाचे आठवे आंतरराष्ट्रीय शतक
    कोहलीचे ३६ वे वन-डे शतक; तर एकंदरीत ६० वे आंतरराष्ट्रीय शतक
    कोहलीचे ३६ वे वन-डे शतक २०४ व्या डावात, तर सचिनचे ३११ व्या डावात
    कर्णधार असताना कोहलीचे एकंदर ३१ वे शतक
    वन-डेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळताना २९ वे शतक; तर धावांचा पाठलाग करताना २२ वे वन-डे शतक
    रोहित शर्माचे वन-डेमधील विसावे शतक
    भारतासमोर ३२३ किंवा त्यापेक्षा जास्त धावांचे आव्हान यापूर्वी २९ वेळा, त्यात सात विजय आणि २२ पराभव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Day Cricket Match West Indies Vs India