एक पराभव म्हणजे मालिका गमाविणे नव्हे- सचिन

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

एका पराभवाने मालिकेचा निकाल लागत नाही. भारतासाठी पुण्यातील कसोटी खूप आव्हानात्मक राहिली. आपले खेळाडू काहीच चांगले करु शकले नाहीत. विजय-पराभव हा खेळाचाच भाग आहे.

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका कसोटी पराभव स्वीकारावा लागला म्हणजे मालिका गमाविली असे होत नाही. मालिकेत पुन्हा पुनरागमन करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असल्याचे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 333 धावांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांनी लोटांगण घेतल्याचे पहायले मिळाले. भारतीय संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका होत असताना सचिन तेंडुलकरने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे.

सचिन म्हणाला, की सगळेकाही संपले आहे, असे झालेले नाही. पराभव हा क्रिकेटचाच एक भाग आहे. एका पराभवाने मालिकेचा निकाल लागत नाही. भारतासाठी पुण्यातील कसोटी खूप आव्हानात्मक राहिली. आपले खेळाडू काहीच चांगले करु शकले नाहीत. विजय-पराभव हा खेळाचाच भाग आहे. आपल्या संघात क्षमता असून, आपण पुन्हा मालिकेत पुनरागमन करू. ऑस्ट्रेलियाच्या संघालाही याची माहिती आहे.

Web Title: One loss doesn't mean series is lost, says Sachin Tendulkar