esakal | World Cup 2019 : आत्ता हारलोय, फायनलला फक्त आम्हीच!
sakal

बोलून बातमी शोधा

Ben_Stokes

World Cup 2019 : आत्ता हारलोय, फायनलला फक्त आम्हीच!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : लॉर्ड्स : विश्व करंडक स्पर्धेच्या अभियानाची चांगली सुरूवात झाल्यानंतरही यजमान इंग्लंडचा संघ या स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडताना दिसत आहे. गेल्या सलग दोन सामन्यात श्रीलंका (20 रन) आणि ऑस्ट्रेलिया (64 रन) आणि त्या अगोदर पाकिस्तानसोबत पराभव पत्करावा लागल्याने इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत दाखल होऊ शकेल का? अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

सात सामन्यात आठ गुण मिळविलेला इंग्लंडचा संघ गुणतक्त्यात चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेत आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी इंग्लंडला भारत (30 जून) आणि न्यूझीलंड (3 जुलै) या तगड्या संघाशी दोन हात करावे लागणार आहेत. त्यामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा 'राम भरोसे' आहे. मात्र, तरी देखील यंदाचा विश्व करंडक आम्हीच जिंकणार, असा ठाम विश्वास इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावल्यानंतर प्रतिक्रिया देताना स्टोक्स म्हणाला, ''यंदाचा विश्व करंडक आमचाच आहे. गेल्या चार वर्षांपासून आम्ही कसून तयारी केली आहे. विश्व करंडक स्पर्धा ही महत्त्वाची स्पर्धा असून या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. पराभव झाला म्हणून आम्ही मागे हटणार नाही. कारण हा वर्ल्ड कप आमचा आहे.'' स्टोक्सने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनुक्रमे नाबाद 82 आणि 89 धावांची खेळी केली होती. 

स्टोक्स पुढे म्हणाला, ''सामना गमाविणे हे निराशाजनक असते, प्रत्येक खेळाडू मैदानावर सामना जिंकण्यासाठीच उतरतो. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध धावा काढणे आणि खेळाडूंना बाद करणे हे प्रत्येक खेळाडूला आवडते. मात्र, जर तुम्ही तुमच्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलात, तर या गोष्टींचा काहीही उपयोग नसतो.

2015 नंतर मायदेशातील भूमीवर इंग्लंडचा संघ खेळत असूनही त्यांना तीन पराभव स्वीकारावे लागले आहेत. उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी इंग्लंडला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

loading image
go to top